योगेश्वर
श्रीकृष्णाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय आजचे पहिले पुष्प हे योगेश्वरचरणी समर्पित !! 'अधिकस्य अधिकम् फलम् ' देणारा हा अधिकमास विष्णूला अत्यंत प्रिय आहे. या मासाचे महात्म्य आपण बालपणापासून ऐकत आलो आहोत. श्रीविष्णू म्हणजेच भगवान श्रीकृष्ण ! श्रीकृष्णाला पूर्ण पुरुष म्हटले जाते .खरेच आहे. मानवजन्माच्या सर्व वेदना सोसून प्रत्येक पायरीवर आदर्श वर्तन करणारे भगवंत खरे खरे आदर्श आहेत. आपण सामान्य मर्त्य मानवआहोत आपल्याला थोडेच ते झेपणारे आहेत ? पण जसजसे आपण भगवंतांना शरण जाऊ ,त्यांच्या विषयी जाणून घेऊ तसतसे आपण बंधमुक्त होऊ लागतो. नंद-यशोदेचा लल्ला ,लाडका कान्हा अक्रुराबरोबर गोकुळ सोडून जातो ते परत न येण्यासाठीच. त्यांची प्रिय राधा तिलाही ते भेटत नाहीत. आयुष्यात एकेक कार्य करीत पुढे-पुढे जाणे आणि आपले उद्दिष्ट पूर्ण करणे हे त्यांच्या चरित्रातून दिसून येते. पांडवांचा पाठीराखा होणे हा भगवंतांच्या आयुष्यातील फार मोठा टप्पा मानता येईल. मित्र ,सखा आणि शिष्योत्तम असलेल्या अर्जूनाला बोध करणे हे फार मोठे कार्य ठरते. अर्जूनाला कुरुक्षेत्रावर विरा...